सर्व समाजामाठी गेल्या अनेक वर्षापासून विश्वसनीय कार्य करणारी संस्था.
आपल्याच भागातील बहूसंख्य उच्चशिक्षित स्थळे नोंदविली गेली असल्यामुळे आपल्याला इतर विवाह केंद्रात किंवा वधू-वर सूचकाकडे नाव नोंदविणेची गरज नाही.
वधू-वरांनी निवडलेल्या स्थळांचे फक्त पत्ते व फोन नंबर देऊन आम्ही थांबत नाही तर ते लग्न जमविणेसाठी विशेष प्रयत्न आम्ही स्वतः करतो.
कॉफीशॉप, हॉटेल यामध्ये करून दिली जाणारी औपचारिक भेट टाळून आम्ही आमच्याच कार्यालयामध्ये कौटुंबिक वातावरणात एकमेकांची प्राथमिक भेट करून देतो.
प्रसंगानुरुप लग्न ठरविण्यापूर्वी मुला-मुलींचे जन्मदाखले, उत्पन्नाचे पुरावे, स्थावर व जंगम मालमत्ता यामंबंधी खात्री देणादे पुरावे एकमेकांना उपलब्ध करुन देऊ शकतो.
पत्रिकेसंबंधी काही माहिती हवी असल्यास कार्यालयातच आवश्यक ते मार्गदर्शन मिळू शकेल.
आपल्याला जर लग्नाची घार्ई-गडबड असेल तर कार्यालयामार्फत वृत्तपत्रामध्ये तुमच्या खर्चाने जाहिरात देणेची सोय उपलब्ध करुन दिली जाईल.
वधू-वर संशोधनापासून ते लग्नापर्यंत लागणाऱ्या सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या जातील. उदा. कार गाडी, ट्रॅव्हल्स, लग्नपत्रिका छपाई, मंगल कार्यालय, केटरिंग, स्टेज डेकोरेशन, लाईटिंग, मंडप, वाजंत्री, हनिमून टूर्स व भविष्यातील आर्थिक गुंतवणूक इत्यादी.
केंद्राचे नियम व अटी
वधुवर सूचक केंद्रात नाव नोंदणी करताना सुरवातीला ₹ 1500/- असे सेवाशुल्क भरावे लागेल. सदर सेवाशुल्क हे एक वर्षासाठी आहे.
नोंदणी फी ही व्यवस्थापन खर्चासाठी (Service Charges) म्हणून घेतली जाते. कृपया याची नोंद घ्यावी. त्यामुळे एकदा भरलेली फी परत मिळणार नाही.
केंद्रात फक्त उच्चशिक्षित वधू-वरांची नोंदणी केली जाते.
नाव नोंदणीसाठी Registration Form तुमच्या फोटोसहीत भरावा. आपण केंद्रात प्रत्यक्ष येऊनही नोंदणी करू शकता.
आपणा फॉर्म मध्ये भरलेली माहिती व आपला फोटो हा Social Networking Site वर देत आहोत याची आपणांस जाणीव आहे. यास आपली हरकत नाही असे आम्ही समजतो.
आपला फोटो हा व्यवस्तिथ असावा व माहीतही अचूक असावी याची कृपया दक्षता घ्यावी.
नोंदणीननंतर आपल्या स्थळाची माहिती 24 तासात वेबसाईट वे टाकली जाते. त्यामुळे इतर सभासदांना आपली माहिती योग्य वाटल्यास ते हि आपणास संपर्क करतात. तेव्हा त्यांच्याशी सौजन्यपुर्वकच बोलावे. जाईल
केंद्राकडून घेतलेल्या माहितीचा कोणीही गैरवायपर करणार नाही याची आम्हास खात्री आहे परंतु तसे आढळल्यास संबंधीत सभासदाची नोंदणी रद्द केली जाईल व त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच तुम्हाला केंद्रामार्फत पाठवलेले ई-मेल व फोटो इतरांना शेअर करू नयेत. अशी माहिती पाठविणे हे सायबर क्राईम मध्ये येते.
नांव नोंदणी केलेनंतर विवाह जमेलच किंवा ठराविक दिवसातच विवाह जमेल याची खात्री किंवा हमी केंद्र देऊ शकत नाही. माफक अपेक्षा व तडजोड केली तर लग्न नक्कीच लवकर जमेल.
आपण घेतलेल्या स्थळांच्या माहितीची सत्यता आपले नातलग, मित्रमंडळी यामार्फत करून घ्यावी. तसेच समोरील पक्षास स्पष्ट माहिती विचारावी. भविष्यात काही प्रश्न उपस्थित झालेस केंद्र जबाबदार राहणार नाही. ती जबाबदारी सभासदांचीच आहे.
स्वप्रयत्नाने विवाह जमून आलेस आपण कार्यालयास कळवावे. न कळविलेस विनाकारण आपला व पर्यायाने समोरील पक्षाचा वेळ वाया जाईल.
पालकांनी, मुलामुलींचा बायोडाटा पाहून त्यांची शैक्षणिक पात्रता, आर्थिक कुवत व शारीरिक अनुरूपता व अपेक्षा लक्षात घेऊन त्याप्रमाणेच स्थळे घ्यावीत.
आपण संपर्क केलेल्या सभासदांना आपला नोंदणी कमांक सांगितलेस ते आपली माहिती व फोटो वेबसाईट वरून जगात कुठेही पाहू शकतील.
नियमांत बदल करणेच अधिकार केंद्राकडे असेल.
तुम्हाला आमचे हे नियम व अटी मान्य असतील तरच विवाहवेध मॅट्रिमोनि वर नांव नोंदणी करा.